Homeठाणे-मेट्रोदिवा मुंब्रा परिसरातील अनधिकृत नळसंयोजनावर कारवाई ; एकूण 109 नळसंयोजने खंडीत

दिवा मुंब्रा परिसरातील अनधिकृत नळसंयोजनावर कारवाई ; एकूण 109 नळसंयोजने खंडीत

ठाणे : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत सर्व्ह‍िस सेंटर व अनधिकृत नळसंयोजन खंडीत करुन पाणीपुरवठा बंद करण्याची मोहिम आयुक्त सौरभ राव यांचे आदेशान्वये सुरु करण्यात आली आहे. दिनांक 17 ते 22 एप्रिल 2024 दरम्यान दिवा, मुंब्रा परिसरातील एकूण 109 अनधिकृत नळ संयोजने खंडीत करण्यात आली आहे.
दिवा साबेबाव कोकण रत्न दिवा महोत्सव मैदानाच्या बाजूला 150 मी.मी व्यासाच्या जलवाहिनीवरील ½ इंची व्यासाचे 18 व ¾ इंची व्यासाचे 04 अशी एकूण 22, वेताळपाडा येथील 100 मी.मी व्यासाच्या जलवाहिनीवरील ½ इंची व्यासाचे एकूण 11, ग्लोबल स्कूलच्या पाठीमागे 200 जलवाहिनीवरील ¾ इंची व्यासाचे 04 अशी एकूण 09 , कोकण रत्न, दिवा महोत्सव मैदानाच्या बाजूला, साबेगाव 150 मी.मी व्यासाच्या जलवाहिनीवरील ½ इंची व्यासाचे एकूण 05, मुंब्रा ठाकूरपाडा येथील नाल्याच्या बाजूला ½ इंची व्यासाची एकूण 06 नळसंयोजने खंडित करण्यात आली असून पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
वारेकर स्कूल जवळ, मुंब्रा देवी कॉलनी 100 मी.मी व्यासाच्या जलवाहिनीवरील ½ इंची व्यासाची एकूण 06, साबे गाव येथील नळसंयोजन खंडीत करुन पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच येथील 100 मी. पी.व्ही.सी पाईप व 1 मोटर जप्त करण्यात आली आहे. साबेगाव रेल्वे ट्रॅकच्या बाजूला 300 मी.मी व्यासाच्या जलवाहिनीवरील ½ इंची व्यासाचे एकूण 50 नळ संयोजन खंडित करण्यात आली असून 1150 मी.पी.व्ही.सी पाईप व 02 मोटर जप्त करण्यात आल्या आहे. संपूर्ण शहरात अशा प्रकारची कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!