दिवा :महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विशेष सहकार्यातून प्रभाग क्रमांक २८ मधील ओमकार नगर ते नाईक नगर दरम्यानच्या रस्ता बांधणी कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या महत्त्वपूर्ण रस्ता कामाचे भव्य भूमीपूजन शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले.
या प्रसंगी उपशहरप्रमुख आदेश भगत, नगरसेविका दर्शना म्हात्रे, नगरसेविका साक्षी मढवी आणि नगरसेवक दीपक जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. हा रस्ता पूर्ण झाल्यावर परिसरातील नागरिकांची वाहतुकीची मोठी अडचण दूर होणार असून दळणवळण अधिक सोयीचे आणि गतिमान होणार आहे. या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली होती.
यामध्ये विभागप्रमुख शशिकांत पाटील, चरणदास म्हात्रे, सचिन चौबे, जगदीश भंडारी, कुशल पाटील तसेच उपविभागप्रमुख रितेश मढवी, शरद पाटील, शंकर म्हात्रे, अजय चव्हाण, किरण साळुंखे, सदाशिव पाटील, आनंद कदम, शाखाप्रमुख प्रशांत कदम आणि उपशाखाप्रमुखांसह महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.
या रस्ता कामाच्या शुभारंभामुळे ओमकार नगर आणि नाईक नगर परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी या विकासकामाबद्दल लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाचे मनापासून आभार मानले आहेत.






