Homeशहर परिसरमुंब्रादेवी कॉलनीतील धोकादायक विद्युत केबल हटवणार

मुंब्रादेवी कॉलनीतील धोकादायक विद्युत केबल हटवणार

नगरसेवक आदेश भगत यांनी करून घेतली पालिकेकडून गटारांची सफाई व नवीन झाकणे बसवण्याचे काम

दिवा : मुंब्रादेवी कॉलनी परिसरातील रस्त्यालगत असलेल्या गटारांमध्ये उघड्या व धोकादायक अवस्थेत असलेल्या विद्युत केबलबाबत नगरसेवक आदेश भगत यांनी तक्रार केल्यानंतर प्रशासनाने आणि टोरेंट कंपनीने याची गंभीर दखल घेतली आहे.

टोरंट पॉवर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणी केली. गटारांमधील या धोकादायक केबलमुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता, या केबल हटवण्याचे काम लवकरच युद्धपातळीवर सुरू केले जाईल, असे आश्वासन टोरंट पॉवरच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.
याशिवाय, पावसाळ्यात किंवा एरवी मुंब्रादेवी कॉलनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याची समस्या निर्माण होत होती. यावर उपाययोजना म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत परिसरातील गटारांची संपूर्ण साफसफाई करण्यात आली. यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास मोठी मदत होणार आहे.
तसेच, या रस्त्यावरील ज्या ठिकाणची गटारांची झाकणे तुटलेली किंवा उघडी होती, तिथे नगरसेवक आदेश भगत यांनी सूचना केल्यानंतर पालिकेने तत्परतेने नवीन आणि मजबूत झाकणे बसवली आहेत. यामुळे पादचारी आणि वाहनचालकांचा प्रवास आता सुरक्षित झाला आहे.

नगरसेवक आदेश भगत यांच्या पाठपुराव्यामुळे हे जनहिताचे काम मार्गी लागल्याने मुंब्रादेवी कॉलनीतील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!