ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक २९ मधील साबेगाव येथे नगरसेविका सौ. अर्चना निलेश पाटील यांच्या नगरसेवक निधीतून तुळशीराम मढवी यांच्या घरापासून देविदास पाटील यांच्या घरापर्यंत पायवाट व गटार बांधकामाचा शुभारंभ आज सकाळी करण्यात आला.
यावेळी नगरसेविका अर्चना निलेश पाटील, विभागप्रमुख निलेश बाळाराम पाटील, उपविभागप्रमुख दिगंबर भोईर, भाजप उपाध्यक्ष अंकुश मढवी, मयूर पाटील, उपशाखाप्रमुख ओंकार खोत, किरण मढवी, प्रमिला ताई मढवी यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.






