Homeशहर परिसरठाणे महापालिकेच्या स्थायी समितीवर १६ सदस्यांची निवड; शिवसेनेचे सर्वाधिक ९ सदस्य

ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीवर १६ सदस्यांची निवड; शिवसेनेचे सर्वाधिक ९ सदस्य

भाजपचे ३, शरद पवार गटाचे २, तर अजित पवार गट आणि एमआयएमचा प्रत्येकी १ सदस्य

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्यांची आज निवड करण्यात आली. यामध्ये शिवसेनेने ९ सदस्यांसह सर्वाधिक प्रतिनिधित्व मिळवले असून भाजपचे ३, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे २, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचा १ आणि एमआयएमचा १ सदस्य स्थायी समितीवर निवडण्यात आला आहे.

महापालिकेच्या आर्थिक आणि प्रशासकीय निर्णयप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्थायी समितीमध्ये विविध राजकीय पक्षांना मिळालेले प्रतिनिधित्व लक्षवेधी ठरणार आहे.

पक्षनिहाय निवड झालेले सदस्य पुढीलप्रमाणे :

शिवसेना (९ सदस्य)
१) पवन कदम
२) राजेश मोरे
३) महेश साळवी
४) दिलीप बारटक्के
५) विक्रांत तांडेल
६) संध्या मोरे
७) प्रमिला केणी
८) बाबाजी पाटील
९) आदेश भगत

भारतीय जनता पक्ष (३ सदस्य)
१) मृणाल पेंडसे
२) कमल चौधरी
३) भरत चव्हाण

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) (२ सदस्य)
१) यासीन खुरेशी
२) पल्लवी जगताप

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) (१ सदस्य)
१) सुहास देसाई

एमआयएम (१ सदस्य)
१) सोयफ फरीब डोंगरे

अशा प्रकारे एकूण १६ सदस्यांची स्थायी समिती गठित झाली आहे.

error: Content is protected !!