दिवा:- फाटक क्रॉस करून रेल्वे फलाटावर जाणाऱ्या दोघांचा लोकलच्या धडकेत जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.बुधावारी सकाळी दिवा रेल्वे स्थानकात ही दुर्दैवी घटना घडली.
दिवा रेल्वे स्थानकात सकाळी 8:21 ची खोपोली लोकल जात असताना हा अपघात घडला. लोकल जात असल्याच्या दरम्याने फाटकातून जाणाऱ्या तिघा प्रवाशांना लोकलचा जोरदार धक्का लागला.या अपघातात दोनजण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातात मृत पावलेल्या दीपक शशिकांत सावंत (वय 26), गीता दिलीप शिंदे (वय 35) हे जागीच ठार झाले असून महादेवी अमोल जाधव (वय 25) या गंभीर जखमी झाल्या आहेत.
“वाढत्या रेल्वे अपघाताकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे.प्रवाशांनी रेल्वे रुळाचा वापर करायला हवा. मुंबई दिशेकडे अस्कलेटर लावल्यास प्रवाशी ब्रीजचा वापर करतील!”
– विजय भोईर
संघर्ष कोकण रेल्वे प्रवाशी संघटना