जाधव यांच्याकडून प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
ठाणे:-ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी प्रभाग क्रमांक २८ चे नगरसेवक दीपक जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग समिती अध्यक्ष पदावर त्यांची निवड होणे आता केवळ औपचारिकता आहे.
दिवा प्रभाग समितीमध्ये शिवसेना आणि भाजप युतीचे एकूण ११ नगरसेवक असून, संख्याबळाच्या जोरावर युतीचाच उमेदवार अध्यक्षपदी विराजमान होणार हे आधीपासूनच स्पष्ट होते.
दिपक जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना पक्षाचे प्रमुख स्थानिक नेते उपस्थित होते. यामध्ये माजी उपमहापौर व नगरसेवक रमाकांत मढवी, नगरसेवक शैलेश पाटील, यांच्यासह शिवसेनेचे ठाण्यातील ज्येष्ठ नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.






