मुंबई: भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या भटक्या विमुक्त जमाती प्रकोष्ठाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ठाण्याचे शिवाजी आव्हाड यांची प्रदेश सह-संयोजकपदी महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपा प्रदेश सरचिटणीस व प्रकोष्ठ प्रभारी राजेश पांडे तसेच भटक्या विमुक्त जमाती प्रकोष्ठाचे प्रदेश संयोजक, माजी आमदार नरेंद्र पवार यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली.
या कार्यकारिणीत इतरही प्रमुख पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत:
प्रदेश सह-संयोजक पद: शिवाजी आव्हाड (ठाणे), राजू साळूंके (रायगड) आणि पी. टी. चव्हाण (बीड).
सदस्य पद: अमोल बावणे (नाशिक), राजेश धोत्रे (पुणे), बाबुराव (तुळशिराम) केंद्रे (नांदेड).
कार्यालय प्रमुख पद: राजेंद्र गोसावी.
शिवाजी आव्हाड यांच्या निवडीबद्दल पक्षातील कार्यकर्त्यांकडून आणि विविध स्तरांतून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.






