Homeशहर परिसरगणेश विसर्जनापूर्वी दिव्यातील प्रमुख रस्त्यांवरील फेरीवाले हटवा - सचिन भोईर

गणेश विसर्जनापूर्वी दिव्यातील प्रमुख रस्त्यांवरील फेरीवाले हटवा – सचिन भोईर

दिवा : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरातील प्रमुख रस्त्यांवरील फेरीवाले तातडीने हटवून विसर्जन मिरवणुकीसाठी मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या दिवा मंडळाचे अध्यक्ष सचिन रमेश भोईर यांनी दिवा प्रभाग समितीकडे केली आहे.

याबाबत २१ सप्टेंबर २०२६ रोजी सहाय्यक आयुक्त, दिवा प्रभाग समिती यांना लेखी निवेदन देण्यात आले. निवेदनात दिवा-सावे रोड, दिवा-शीळ रोड आणि दिवा-आगासन रोड या मार्गांवर मोठ्या प्रमाणात फेरीवाले असल्यामुळे वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

गणेश विसर्जनाच्या दिवशी या मार्गांवर हजारो नागरिक सहभागी होणार असल्याने फेरीवाले तातडीने हटवून रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच विसर्जन पूर्ण होईपर्यंत या मार्गांवर पुन्हा फेरीवाले बसणार नाहीत, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

गणरायाच्या मिरवणुकीसाठी नागरिकांना सुरक्षित आणि मोकळा रस्ता मिळणे आवश्यक असून, याबाबत प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष कारवाई करावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा सचिन भोईर यांनी निवेदनातून दिला आहे.

error: Content is protected !!