Homeठाणे-मेट्रोप्रभू श्री रामाच्या जयघोषाने ठाणे दुमदुमले! "गर्व से कहो हम हिंदू है"...

प्रभू श्री रामाच्या जयघोषाने ठाणे दुमदुमले! “गर्व से कहो हम हिंदू है” च्या टोपी परिधान करत ठाणेकर आंदोलनात सहभागी

अयोध्येतील राममंदिराची तिजोरी लुटल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे जोरदार रामरक्षा आंदोलन

ठाणे: – तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राममंदिराची तिजोरी लुटल्याच्या निषेधार्थ ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज रामरक्षा आंदोलन छेडले. ठाणे स्टेशन येथील गावदेवी मंदिराच्याजवळ असलेले पुरातन हनुमान मंदिरात जोरदार आंदोलन करण्यात आले. “गर्व से कहो हम हिंदू है…जय श्री राम जय हनुमान” नावाच्या टोपी परिधान करत मोठ्या संख्येने ठाणेकर या आंदोलनात सहभागी झाले होते. महाआरती, रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. यावेळी प्रभू श्री रामाच्या जयघोषाने ठाणे दुमदुमले.
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीवर मारलेला डल्ला आणि मंदिर निधीच्या अपहाराच्या आरोपांमुळे तमाम रामभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. श्रीरामाच्या नावाने जमा केलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशेब देशातील प्रत्येक श्रद्धावान हिंदूला मिळाला पाहिजे. रामभक्तांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्याना आता चुकीला माफी नाही, अस म्हणत तमाम ठाणेकरांना रामरक्षा पठण केले. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महाराष्ट्रात “रामरक्षा आंदोलन” छेडले आहे. या आंदोलनाची सुरुवात मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक हनुमान मंदिरात महाआरती, रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालीसा पठणाने झाली आहे. आता ठाण्यातील रामभक्तांच्या आग्रहास्तव हे रामरक्षा आंदोलन आज ठाण्यात आयोजित करण्यात आले होते.

या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी खासदार राजन विचारे, आमदार रमेश कोरगावकर, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, जिल्हाप्रमुख तात्या माने, प्रभाकर म्हात्रे, केदार दिघे, प्रवीण म्हात्रे, महिला जिल्हा संघटिका रेखाताई खोपकर, रंजना शिंत्रे, नीलम ढवण, उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेते गुरुनाथ खोत, मनोज मयेकर, शहरप्रमुख अनिश गाढवे, ठाणे महानगर संघटक महेश कदम, ओवळा-माजिवडा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, सुनील पाटील, ठाणे पालिकेचे नगरसेवक शहाजी (गणेश) खुस्पे, मंदार विचारे, समन्वयक संजय तरे, उपजिल्हा संघटिका अड. आकांक्षा राणे, महेश्वरी तरे, मा. नगरसेविका नंदिनी विचारे, शहर संघटिका प्रमिला भांगे, संगीता साळवी, सुनंदा देशपांडे, राजेश्री सुर्वे, नंदा कोथळे, अपूर्वा तेलवणे, ऋतुजा शिंत्रे, विभाग प्रमुख रमेश शिर्के, तुषार रसाळ, सचिन पाटील, रोहिदास मुंडे, ज्योती पाटील, वसंत गवाळे, सचिन चव्हाण तसेच सर्व विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, उप शहर प्रमुख व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रत्येक रामभक्ताच्या श्रद्धेवर घातलेला घाव – राजन विचारे
अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीसाठी महाराष्ट्रातून पाठवण्यात आलेली पहिली चांदीची पवित्र वीट ठाणे भूमीतून गेली होती. सन १९८७ मध्ये धर्मवीर आनंद दिघे यांनी लोकवर्गणीतून साकारलेली ही वीट प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण करण्यात आली होती. आज ती पवित्र वीटच चोरीला गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. ही केवळ एका वीटेची बाब नाही, तर प्रत्येक रामभक्ताच्या श्रद्धेवर घातलेला घाव आहे.

रामाच्या संपत्तीवर डल्ला – ज्योती ठाकरे

प्रभू श्री रामाचे मंदिर लुटले त्यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. रामाच्या संपत्तीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला त्यांना हिंदु माफ करणार नाही. आता प्रतेक हिंदू भडकला असून अयोध्येतील मंदिर ट्रस्टवर असलेल्या कोष्याध्यक्षचे काय करणार असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे उपस्थित केला.

error: Content is protected !!