Homeशहर परिसरमनसेचे तुषार पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी; राज ठाकरेंकडून 'कल्याण ग्रामीण जिल्हा संघटक'...

मनसेचे तुषार पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी; राज ठाकरेंकडून ‘कल्याण ग्रामीण जिल्हा संघटक’ पदी नियुक्ती!

दिवा:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाची आगामी वाटचाल आणि संघटनात्मक मजबुती लक्षात घेऊन एक मोठा निर्णय घेतला आहे. मनसेचे निष्ठावंत आणि कुशल संघटक म्हणून ओळखले जाणारे तुषार पाटील यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली असून, त्यांची ‘कल्याण ग्रामीण जिल्हा संघटक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तुषार पाटील यांनी यापूर्वी मनसेचे विभाग अध्यक्ष म्हणून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली होती. त्यानंतर मागील चार वर्षांपासून ते दिवा शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. दिवा शहराध्यक्ष म्हणून त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मनसेची संघटनात्मक बांधणी उत्तम रीतीने केली. सध्याच्या राजकीय वातावरणात इतर पक्षांमध्ये कार्यकर्त्यांची मोठी पडझड किंवा पक्षांतर होत असताना, दिवा शहरात मात्र तुषार पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिले.

“तुषार पाटील यांची संघटनेवरील मजबूत पकड आणि कामाचा धडाका लक्षात घेऊनच पक्षाने त्यांना जिल्हा पातळीवर काम करण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.”
या नव्या नियुक्तीमुळे पक्षाची भूमिका प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यास आणि कल्याण ग्रामीण भागात मनसे अधिक बळकट करण्यास मोठी मदत होणार आहे. पाटील यांच्यावर सोपवण्यात आलेल्या या नवीन जबाबदारीमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्ष वाढीच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

error: Content is protected !!