Homeशहर परिसरमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून डोंबिवली, दिवा आणि कल्याण ग्रामीण भागात नवीन...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून डोंबिवली, दिवा आणि कल्याण ग्रामीण भागात नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर!

दिवा:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या संघटनात्मक रचनेत मोठे बदल करत डोंबिवली, दिवा आणि कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.पक्षाच्या अधिकृत पत्रकाद्वारे या घोषणा करण्यात आल्या. पक्षाची संघटनात्मक पकड मजबूत करण्यासाठी या नियुक्त्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

या नव्या निवडीनुसार, श्री. राहुल कामत यांच्यावर डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्राच्या जिल्हा अध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
श्री. प्रल्हाद म्हात्रे (जिल्हा संघटक – डोंबिवली), श्री. तुषार पाटील (जिल्हा संघटक – कल्याण ग्रामीण), श्री. संदेश पाटील (विधानसभा अध्यक्ष – डोंबिवली) आणि श्री. विनोद पाटील (विधानसभा अध्यक्ष – कल्याण ग्रामीण) यांचा समावेश आहे. तसेच श्री. अरुण जांभळे यांच्याकडे जिल्हा सचिवपदाची जबाबदारी दिली असून श्री. योगेश पाटील आणि श्री. राजू पाटील यांची उप-जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. डोंबिवली विधानसभा उप-शहर अध्यक्ष म्हणून श्री. भाग्येश इनामदार काम पाहतील.तसेच श्री. हर्षद पाटील यांची डोंबिवली शहर अध्यक्ष म्हणून, तर श्री. प्रशांत गावडे यांची दिवा शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या सर्व नियुक्त्या एक वर्षाच्या कालावधीसाठी असून, त्यांच्या कामाचा अहवाल पाहूनच पुढील मुदतवाढीचा निर्णय घेतला जाईल, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. या नव्या कार्यकारिणीमुळे डोंबिवली, कल्याण आणि दिवा पट्ट्यात मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!