Homeठाणे-मेट्रोमातोश्रीवर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक; उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन

मातोश्रीवर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक; उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन

ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिवा, कळवा व मुंब्रा परिसरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज मातोश्री येथे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी ठाकरे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत पक्षनिष्ठा, संघटनात्मक बांधणी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी काम करण्याबाबत मार्गदर्शन केले.

कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत आणि कल्याण जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांच्या नेतृत्वाखाली विभागप्रमुख पदापर्यंतच्या पदाधिकाऱ्यांसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी तळागाळात सक्रियपणे काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

बैठकीस कल्याण लोकसभा जिल्हा संघटक रविंद्र सुर्वे, जिल्हा संघटिका कल्पना कवळे, उपजिल्हाप्रमुख रोहिदास मुंडे, विजय देसाई, ज्येष्ठ शिवसैनिक राम पाटील, दिवा शहरप्रमुख सचिन पाटील, कळवा शहरप्रमुख लहु चाळके, उपशहरप्रमुख गुरुदत्त देसाई व नंदू पाटील यांच्यासह विभागप्रमुख सतीश मांडरेकर, सचिन पारकर, गोपीनाथ पाटील, संतोष कवळे, नंदकुमार दुराफे, दुर्योधन फडतरे, लवेश जाधव आणि संतोष सुर्वे आदी उपस्थित होते.

या बैठकीमुळे दिवा, कळवा आणि मुंब्रा परिसरातील पक्ष संघटनेला नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिक बळ मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!