दिवा : दिव्यातील मुंब्रादेवी कॉलनी, काळूबाई अपार्टमेंट, शुभम पार्टी हॉल आणि अर्जुन स्कॅन सेंटर परिसरातील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. यावेळी नगरसेवक आदेश भगत, नगरसेवक शैलेश पाटील, नगरसेविका दिपाली भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील नागरिकांची वाहतूक अधिक सुलभ होणार असून मूलभूत सुविधांमध्ये भर पडणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.






