Homeशहर परिसरशिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आगासनगावात मोफत फिजिओथेरपी आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आगासनगावात मोफत फिजिओथेरपी आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

दिवा:-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आगासनगाव येथील दत्त मंदिर परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत फिजिओथेरपी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डिग्निटी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित या शिबिराचे संयोजन शिवसेना उपजिल्हाप्रमुख ॲड. रोहिदास बामा मुंडे यांनी केले.

या शिबिरामध्ये ५५ वर्षांवरील नागरिकांना सांधेदुखी, गुडघेदुखी, मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, खांदेदुखी, अर्धांगवायू तसेच लकवा यांसारख्या विविध शारीरिक व्याधींवर डॉ प्रियंका मोरे व डॉ. विशाल गुप्ता तज्ज्ञांकडून मोफत तपासणी व फिजिओथेरपी उपचारांचा लाभ देण्यात आला. परिसरातील मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला.

यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना ॲड. रोहिदास मुंडे यांनी सांगितले की, “शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून समाजसेवेची परंपरा जपणारी चळवळ आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा छोटासा प्रयत्न असून भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील.”

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डिग्निटी फाउंडेशनचे प्रतिनिधी, शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच स्थानिक नागरिकांनी विशेष सहकार्य केले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा आरोग्यविषयक शिबिरांची गरज व्यक्त केली.

error: Content is protected !!