दिवा:शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहत राजे प्रतिष्ठान मंडळाने यंदाचा रास गरबा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निर्णयाचा आदर्श घेत हा निर्णय घेण्यात आल्याचे नगरसेविका तथा राजे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अर्चना निलेश पाटील यांनी सांगितले. गरबा आयोजनासाठी होणारा खर्च शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. तसेच निवडून आल्यानंतरचे दहा महिन्यांचे सुमारे १ लाख ५० हजार रुपये मानधन डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनमध्ये जमा करण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला. पूर, दुष्काळ आणि कोरोनासारख्या संकटात प्रतिष्ठानने जनसेवेत योगदान दिल्याचे पाटील यांनी नमूद केले.






