दिवा : दिव्यातील नवभारत हिंदी वर्तमानपत्राचे पत्रकार विनीत तिवारी यांचे वडील दिनेश चंद्र तिवारी (वय ६४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी निधन झाले. मागील एक आठवड्यापासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती.
दिनेश चंद्र तिवारी यांच्या निधनाने तिवारी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार आहे. त्यांच्यावर उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यातील पैतृक गाव चितावां येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.






