Homeशहर परिसरसाबे भागातील नागरिकांना महापालिकेने अधिकृत पाईपलाईन मधून पाणीपुरवठा सुरू करावा

साबे भागातील नागरिकांना महापालिकेने अधिकृत पाईपलाईन मधून पाणीपुरवठा सुरू करावा

पाणीटंचाई बाबत नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांची महासभेत अभ्यासपूर्ण मागणी

दिवा : दिवा शहरातील साबे भागात ज्या ठिकाणी महापालिकेच्या पाईपलाईनमधून पाणी पोहोचत नाही, त्या ठिकाणी प्रथम अधिकृत पाणीपुरवठा सुरू करा आणि त्यानंतरच नागरिकांच्या नळजोडण्या तोडण्याची कारवाई करा, अशी ठाम भूमिका प्रभाग क्रमांक २९ च्या नगरसेविका सौ. अर्चना निलेश पाटील यांनी ठाणे महापालिकेच्या महासभेत मांडली.

साबे भागातील नागरिकांना महापालिकेच्या पाईपलाईनमधून पाणी मिळत नसतानाही पाणीपट्टी भरावी लागते. त्यातच दैनंदिन गरजांसाठी टँकरद्वारे किंवा अन्य ठिकाणांहून पाणी विकत घ्यावे लागत असल्याने नागरिकांवर आर्थिक भार पडत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करणे ही महापालिका प्रशासनाची जबाबदारी असल्याचे अर्चना पाटील यांनी स्पष्ट केले.
प्रथम अंतर्गत पाईपलाईन योग्य पद्धतीने टाकून अधिकृत पाणीपुरवठा सुरू करावा. तसेच चोरीच्या नळजोडण्यांवर कारवाई करताना नागरिकांना मुबलक पाणी देण्यासाठी महापालिकेचे नेमके धोरण काय आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
महापालिकेने नियमित पाणीपुरवठा केल्यास नागरिकांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही, असेही अर्चना पाटील यांनी नमूद केले. यावेळी ठाणे महापालिका अधिकाऱ्यांनी ही साबे विभागात लवकरच पाहणी करून नवीन आराखडा तयार करू असे आश्वासन दिल्याची माहिती विभाग प्रमुख निलेश पाटील यांनी दिली.

error: Content is protected !!