दिवा:-ठाणे महापालिका धर्मवीर आनंद दिघे हृदयरोग उपचार केंद्र व छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा,मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तिसाई नगर येथील जनसंपर्क कार्यालयात या शिबिराचे आयोजन विनोद मढवी व साक्षी मढवी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.या शिबिरात नागरिकांच्या ईसीजी, शुगर तपासणी,ब्लड तपासणी इत्यादी टेस्ट करण्यात आल्या त्याचबरोबर या शिबिराच्या माध्यमातून विविध गंभीर आजारावरील शस्त्रक्रियाही मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.चरणदास म्हात्रे, दीपक जाधव,निलेश म्हात्रे, शशिकांत पाटील, उमेश पाटील, संजय भगत, आदेश भगत,सोपान म्हात्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.