Homeठाणे-मेट्रोशारदा संकल्प प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 11 च्या वतीने...

शारदा संकल्प प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 11 च्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

ठाणे:-शारदा संकल्प प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 11 च्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून गोकुळ नगर येथे योगा दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

येथील वर्धमान हॉल येथे सकाळी 9 ते 10 च्या दरम्यान सदर योगा कार्यक्रमाचे आयोजन ठाणे महानगर पालिकेचे माजी नगरसेवक कृष्णा दादू पाटील,माजी नगरसेविका सौ.नंदा कृष्णा पाटील,व भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर सरचिटणीस सचिन दादू पाटील यांच्या पुढाकाराने पार पडले.
यावेळी अंबिका योग कुटीरच्या प्रतिनिधीनी प्रात्यक्षिक दाखवून सर्वांना योगाचे धडे दिले.

सदर कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक पेड मां के नाम या संकल्पनेनुसार माजी नगरसेवक श्री कृष्णा पाटील व माजी नगरसेविका सौ नंदा पाटील यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे शाल व महिलांना वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाची झाड भेट देण्यात आली.तसेच आंबा ,पिंपळ,बदाम यासारखी झाडे ही भेट देण्यात आली.
तसेच या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल सर्वांनी नगरसेवक कृष्णा पाटील,व नगरसेविका नंदा पाटील यांचे आभार व्यक्त केले.सदर कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!