दिवा:-दिवा शहरात स्वतंत्र पोस्ट ऑफिस असावे यासाठी येथील नागरिक अनेक वर्षांपासून मागणी करत आहेत.अखेर दिवा शहरात स्वतंत्र पोस्ट ऑफिस होत असून याचा शुभारंभ दोन सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती जागा हो दिवेकर चे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते विजय भोईर यांनी दिली.
दिवा शहरातील नागरिकांना पोस्ट ऑफिस बाबत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.नागरिकांची येणारी पत्र पोस्ट ऑफिस पूर्णवेळ क्षमतेने सुरू नसल्याने वेळेवर पोहोचत नव्हती. आता दिव्यात पूर्ण क्षमतेने पोस्ट ऑफिस सुरू होणार असल्याने कर्मचारी संख्याही वाढेल व नागरिकांना दिलासा मिळेल अशी माहिती विजय भोईर यांनी दिली.






