Homeठाणे-मेट्रोगणपती विसर्जन करणाऱ्या युवकांना मानधन द्या मनसेची मागणी

गणपती विसर्जन करणाऱ्या युवकांना मानधन द्या मनसेची मागणी

ठाणे : गणेश उत्सवामध्ये गणपती विसर्जन करणे हे मोठे जोखमीचे काम असते आणि गेली अनेक वर्ष काही स्वयंसेवक हे काम उत्स्फूर्तपणे करत आहेत पण याची दखल घेतली जात नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे गणपती विसर्जन करणाऱ्या युवकांना मानधन द्यावे अशी मागणी मनसेच्या वतीने महापालिकेकडे केली आहे.
पालिका प्रशासन कृत्रिम तलाव, लाईट, निर्माल्य कलश यावरती खर्च करत असते आणि हे योग्यही आहे, परंतु जे स्वयंसेवक मदत करत असतात त्यांच्यासाठी मानधन का उपलब्ध करून दिले जात नाही, जर त्यांना योग्य मानधन दिले तर ही मुले विसर्जनाचे काम निश्चितच अजून जबाबदारीने करतील. या मुलांच्या समस्येचा गांभीर्याने विचार करावा आणि त्यांना योग्य ते मानधन उपलब्ध करून अशी मागणी मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे.

error: Content is protected !!