दिवा:-कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी दिवा शहरातून मोफत बसेस शिवसेनेच्या माध्यमातून गुरुवारी सोडण्यात आल्या. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. दिवा शहरातील कोकणी बांधवांनी या मोफत बस सेवेला भरभरून प्रतिसाद दिला.संध्याकाळी दिवा शहरातून कोकणच्या दिशेने या बस रवाना झाल्या.यावेळी दिवा शहर शिवसेनेचे शहर प्रमुख माजी उपमहापौर रमाकांत मढवी, उपशहर प्रमुख शैलेश पाटील, उमेश भगत, निलेश पाटील,भालचंद्र भगत, गणेश मुंडे,साक्षी मढवी यांसह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.






