Homeठाणे-मेट्रोघोडंबदरच्या अर्ध्या भागाची सकाळी झाली बत्तीगुल ; घोडबंदर वासीय गर्मीने हैराण

घोडंबदरच्या अर्ध्या भागाची सकाळी झाली बत्तीगुल ; घोडबंदर वासीय गर्मीने हैराण

ठाणे: एकीकडे ऑक्टोबर हिट चटके बसत असताना, ऐन्य नवरात्रोत्सवात सोमवारी सकाळीच अर्ध्या घोडबंदर रोड परिसरातील बत्ती गुल झाली होती. दुपार चार वाजण्याच्या सुमारास विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यावर त्या भागातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. महावितरणच्या पातलीपाडा येथील वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वहिनीला सकाळी ९ च्या सुमारास आग लागल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. असे सांगण्यात आले.
आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने आॅफिसला निघायची वेळ असल्याने गृहिणींची देखील चांगलीच तारांबळ उडाली.तर वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर कासारवडवली, आनंद नगर,वाघबीळ, ग्रीन व्हॅली,प्रेस्टिज व्हॅली,रोजा बेला,पंचामृत,अशा मोठ्या गृहसंकुलाना आणि परिसरांना याचा फटका बसला. विशेष म्हणजे बाहेरून जेवणाची आॅनलाईन आॅर्डर देऊनही डिलिव्हरी बॉय लिफ्ट सुरु नसल्याने १५ मजले कोण चढणार या भीतीने इमारतीच्या खालीच आॅर्डर ठेऊन जात होते. त्यामुळे नागरिकांना खाली उतरून आॅर्डर घ्यावी लागली. तर मोबाईल चार्ज नसल्याने मोबाईल बंद पडल्याने लहान मुलांपासून मोठी मंडळीही हैराण झाल्याचे दिसून आले. सात तास उलटल्यानंतर दुपारी ४ च्या दरम्यान वीज पुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

error: Content is protected !!