ठाणे: वागळे इस्टेट, जिजामाता नगर परिसरातील श्रद्धा आनंद सोसायटीच्या तळमजल्यावरील प्रथमेश कॅटरर्स नामक दुकानामधील फ्रिजला आग लागली. ही शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास समोर आल्यानंतर अर्ध्या तासात त्या आगीवर नियंत्रणात आले. मात्र या घटनेत दुकानातील २ फ्रिज व इतर साहित्य जळून खाक झाले. याबाबत विशाल हिंगे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळविले. याचदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने दुकानातील ०२ गॅस सिलिंडर अग्निशमन दलाच्या जवानांकडे जमा करण्यात आले आहेत.अशी माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.






