Homeठाणे-मेट्रोठाणे शहर आणि कळवा, मुंब्रा येथील काही भागात गुरूवारी पाणी नाही

ठाणे शहर आणि कळवा, मुंब्रा येथील काही भागात गुरूवारी पाणी नाही

तातडीच्या दुरुस्तीसाठी १२ तासांचा शटडाऊन

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर ९० फूट रस्त्यालगत कळवा टॅपिंगवरील एअर व्हॉल्व गळती होत असल्याने तातडीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवार, १६ जानेवारी रोजी स. ९ ते रा. ९ या काळात ठाणे शहर आणि कळवा, मुंब्रा येथील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

जलवाहिनीवरील गळती रोखण्यासाठी महापालिकेच्या स्वत:च्या आणि स्टेम प्राधिकरणाच्या योजनेतील पाणी पुरवठ्यावर हा १२ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे, घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, ऋतू पार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समता नगर, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याचा काही भाग येथे १२ तासांसाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील.

या कपातीच्या काळात पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!