Homeठाणे-मेट्रोमालवणी महोत्सवात खेळ रंगला पैठणीचा

मालवणी महोत्सवात खेळ रंगला पैठणीचा

ठाणे : ठाण्यातील शिवाई नगर येथील उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित “मालवणी महोत्सवात मंगळवारी खेळ रंगला “पैठणी’चा या प्राथमिक फेरीच्या कार्यक्रमात महिलावर्गात चांगलीच चुरस रंगलेली पहावयास मिळाली. या रंगतदार खेळाला शेकडो लाडक्या बहिणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . दरम्यान, मालवणी महोत्सवात मराठमोळा फॅशन रॅम्प वॉक आणि बहारदार लावणीचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला.
महिलांना घरच्या कामातुन तसेच नोकरीच्या दररोजच्या व्यापातुन विश्रांती घेऊन मनोरंजन करण्याचे आणि गृहिणी, नोकरदार महिलांना आपल्यातील कलागुण सादर करण्याची संधी मिळावी यासाठी सीताराम राणे यांच्या मालवणी महोत्सवात “खेळ रंगला पैठणीचा ” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शुक्रवारी रात्री पार पडलेल्या पैठणीच्या स्पर्धेतील प्राथमिक फेरीमध्ये शेकडो लाडक्या बहिणींनी तळ्यात… मळ्यातच्या धर्तीवर लेफ्ट -राईट उड्या, सुईत दोरा ओवणे, कपाचा पिरॅमिड्स, दोऱ्यात मणी ओवणे, फुगा फुगवून बसून फोडणे, स्ट्राॅ केसात रोवणे, रिंगातुन उडी मारणे, चेंडू बादलीत टाकणे, चेंडू रिंगात खेळणे, रस्सीखेच आदीं मनोरंजक खेळांमध्ये गाण्यांच्या तालावर सहभाग नोंदवला. महिलांचा उत्साह पाहून उपस्थित रसिकांनीही “पैठणीच्या” या स्पर्धेचा आनंद लुटला.
दरम्यान, मालवणी महोत्सवात मराठमोळा फॅशन रॅम्प वॉक आणि बहारदार लावणीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रत्येकीने पारंपारिक वेषभूषेत आपल्यातील अंगभूत कला कौशल्याचे सादरीकरण केले.

error: Content is protected !!