Homeठाणे-मेट्रोधर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त निष्ठावंत शिवसैनिकांकडून अभिवादन

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त निष्ठावंत शिवसैनिकांकडून अभिवादन

ठाणे: गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने समस्त ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी सोमवारी दिघे साहेबांच्या शक्ति स्थळावरील समाधीस अभिवादन करून दर्शन घेतले. तसेच टेंभी नाका येथील गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून “अमर रहे अमर रहे… दिघे साहेब अमर रहे” या घोषणांनी टेंभी नाका परिसर दुमदुमला. याप्रसंगी शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, सुरेश मोहिते, कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, विश्वास निकम, अनिष गाढवे, वसंत गवाळे, संजय तरे, संजय दळवी, चंद्रकांत विधाटे, विभाग प्रमुख संजय भोई, प्रकाश पायरे, जिवाजी कदम, प्रतिक राणे, मयूर पैलकर, व्यंकट कांबळे, महेंद्र पाटील, मितेश देशमुख, हेमंत व्यापारी, बिपीन गेहलोत, अमोल हिंगे, वरून मानकामे, माजी. नगरसेविका नंदिनी विचारे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, महेश्वरी तरे, आकांक्षा राणे, संपदा पांचाळ, ज्योती किरण कोळी, वैशाली शिंदे, वासंती राउत, प्रमिला भांगे, मंजिरी ढमाले, संपदा उरणकर, कविता नार्वेकर, राजेश्री नवीन सुर्वे, सुनंदा देशपांडे तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!