ठाणे:- राज्यातील पोलीस दलासाठी सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा बारा वर्षानंतर पुन्हा एकदा ठाणे शहरात 22 फेब्रुवारी ते 01 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे साडेतीन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत. साकेत पोलीस मैदानावर झालेल्या ज्यूदो स्पर्धेत ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस नाईक भूपेंद्र सिंग राजपूत यांनी 100 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले आहे.अंतिम फेरीमध्ये थोड्याशा गुणांनी त्यांचं सुवर्णपदक निसटले.
भूपेंद्रसिंग याने नागपूर, छत्रपती संभाजी नगर, एस आर पी एफ, येथील पोलीस खेळाडूंना हरवून अंतिम स्पर्धेसाठी स्वतःची जागा निश्चित केली होती. विजेत्यांचे मुंबईचे पोलीस सह आयुक्त एस जयकुमार, भापोसे राजेंद्र दगडे , ठाणे शहर ज्यूडो असोसिएशनचे टिळक थापा, तसेच असोसिएशनचे इतर पदाधिकारी व माजी खेळाडू तथा पोलीस उपनिरीक्षक माळोदे यांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्रक व मेडल देऊन सत्कार करण्यात आला. भूपेंद्रसिंग यांच्या विजयाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.