Homeठाणे-मेट्रोनिवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणीला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट...

निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणीला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठाणे:- निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना सुरू करून मानधन १५०० वरून २१०० रुपये करणार असे आश्वासन दिले होते. परंतु गेले दोन महिने मानधनच खात्यात जमा न झाल्याने महिलांच्या मनात शासनाच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे. महिलांचा अपेक्षाभंग केल्यामुळे सरकारने तात्काळ महिलांना मानधन बँकेत जमा करावा, अशी मागणी ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला ठाणे जिल्हा आघाडीने निवेदन पत्राद्वारे केली. हे निवेदन पत्र शिवसेना आघाडीने बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना तहसीलदार मार्फत देण्यात आले. त्यावेळी ठाणे जिल्हा संघटक रेखा खोपकर, शहर संघटक वैशाली शिंदे, उप शहर संघटक अनिता प्रभू, मंजिरी धमाले, शाखा संघटक सीमा पाटील व इतर महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!