दिवा:-पत्रकार विनोद वास्कर यांना शिळफाटा येथे भर चौकात राहुल काटे आणि जितू आलीमकर यांनी मारहाण केली असल्याची माहिती वास्कर यांनी दिली.या घटनेचा निषेध सर्व स्तरातून व्यक्त होत असून पत्रकार वास्कर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी पत्रकार संघटनांकडून होत आहे. मारहाणीच्या घटनेनंतर विनोद वास्कर यांना उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शिळ डायघर पोलीस ठाण्यावर धडक दिली आहे. पत्रकाराचा मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन तक्रार दाखल केली जाईल. अशी माहिती शिळ डायघर पोलिसांनी दिली. तसेच पोलिसांकडून आरोपींचा शोध देखील सुरू करण्यात आला आहे.