Homeठाणे-मेट्रोनवनियुक्त सहाय्यक आयुक्तांच्या खांद्यावर प्रभाग समितीची जबाबदारी ; दिवा प्रभाग समितीच्या आयुक्त...

नवनियुक्त सहाय्यक आयुक्तांच्या खांद्यावर प्रभाग समितीची जबाबदारी ; दिवा प्रभाग समितीच्या आयुक्त पदी शिवप्रसाद नागरगोजे

ठाणे:- राज्य शासनाकडून ठाणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त म्हणून सात जणांचे नियुक्ती करण्यात आली. त्यापैकी ४ जणांच्या खांद्यावर प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त पदीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या संदर्भात सोमवारी ठामपा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी पत्रक काढले आहे. तर एका सहाय्यक आयुक्ताच्या खांद्यावर प्रभाग समितीसह क्लस्टर सेलची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. तर, सहाय्यक आयुक्त पदाची अतिरिक्त जबाबदारी दिलेल्या त्या तिघांचा त्या पदाचा अतिरिक्त भार संपुष्टात आल्याचे म्हटले आहे.
ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदे रिक्त असल्याने त्या पदाची अतिरिक्त जबाबदारी कनिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. याचदरम्यान शासनाकडून सहायक आयुक्त नियुक्त केल्यानंतर महापालिका हजर झालेल्या सहाय्यक आयुक्तांना जबाबदारी सोपविण्यात आले. या संदर्भात सोमवारी काढलेल्या एका ऑर्डरनुसार दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तपदी शिवप्रसाद नागरगोजे यांची , वर्तकनगर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी विजय कावळे, लोकमान्यनगर सावरकर नगर प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त पदी सोमनाथ बनसोडे तर माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त पदी सोनल काळे या नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कळवा प्रभाग समिती राजेंद्र गिरी तर उथळसर प्रभाग समिती आणि क्लस्टर सेल च्या सहाय्यक आयुक्तपदाची धुरा भालचंद्र घुगे यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. याशिवाय इतर ०३ सहाय्यक आयुक्तांना कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही.
या पाठवले मूळ पदी
कार्यालयीन अधीक्षक तनुजा रणदिवे, स्मिता सुर्वे आणि कार्यालयीन उपअधीक्षक ललिता जाधव या तिघींवर मध्यंतरी अतिरिक्त सहाय्यक आयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण, राज्य शासनाकडून सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती झाल्याने त्या तिघींचा अतिरिक्त पदभार संपुष्टात आल्याचे म्हटले आहे.

error: Content is protected !!