Homeठाणे-मेट्रोठाण्यात उन्मळून झाडे पडल्याचा दोन घटना ; एका घटनेत अग्निशमन जवान जखमी

ठाण्यात उन्मळून झाडे पडल्याचा दोन घटना ; एका घटनेत अग्निशमन जवान जखमी

ठाणे:- शहरातील वेगवेगळ्या दोन ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. एका घटनेत एक सुकलेले झाडे पार्क केलेल्या कारवर पडले. दुसऱ्या घटनेत मोकळ्या जागेत पडलेले झाड कटिंग करताना ठाणे महापालिका अग्निशमन जवान किरण चौरे (३८) हे जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताच्या पंजाला दुखापत झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
बुधवारी ३० एप्रिल २०२५ रोजी रात्री सव्वा नऊ ते साडे नऊ वाजण्याच्या सुमारास लुईसवाडी, या ठिकाणी असलेल्या राजहंस सोसायटीच्या आवारातील एक सुकलेले झाड पार्क केलेल्या कारवर पडले. या घटनेत, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दुसरी घटना गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास समोर आली. वागळे इस्टेट परिसरातील कशिश पार्क, या ठिकाणी मोकळ्या जागेत झाड पडले. या घटनेत झाड कटिंग करताना, ठाणे महापालिका अग्निशमन दलाचे जवान किरण चौरे हे जखमी झाले आहे. या दोन्ही घटनांची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन या विभागांनी धाव घेत, पडलेली झाडे कापून एका बाजूला केली. वागळे इस्टेट येथे झाड कटिंग करताना चौरे या जवानाच्या उजव्या पायाच्या पंज्याला दुखापत झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.

error: Content is protected !!