Homeठाणे-मेट्रोकळव्यात घराला आग

कळव्यात घराला आग

ठाणे:- कळवा आनंद नगर येथील श्रद्धा सोसायटी “बी” विंगच्या पहिल्या मजल्यावरील रूम क्रमांक १०१ या घरात शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग जवळपास पाऊण तासांनी नियंत्रणात आली. तसेच या घटनेत त्या घरातील लाकडी देव्हारा, टीव्ही, सिलिंग फॅन, ०२-लाकडी कपाट, ०२-लॅपटॉप, कुलर मशीन, लाकडी टेबल, शिलाई मशीन व इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे जळून खाक झाले आहे. सदर रूम हा
उमरउल्ला अब्दुल्ला रशीद खान यांच्या मालकीचा असून त्या रूममध्ये सरोज सुधाकर माने या भाड्याने राहत आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी धाव घेतली. तसेच तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यावर आग अकरा वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे नियंत्रणात आली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

error: Content is protected !!