Homeशहर परिसरआठ दिवसात दिव्यातील नालेसाफई न झाल्यास ठाकरेंच्या शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

आठ दिवसात दिव्यातील नालेसाफई न झाल्यास ठाकरेंच्या शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

दिवा:-शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे दिवा शहरच्या वतीने शहर प्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वखालील दिवा शहरातील नालेसफाई पाहणी दौरा अधिकाऱ्यांसोबत करण्यात आला. यावेळी दिवा शहरातील प्रमुख नाल्याची पाहणी करण्यात आली. जिथे नालेसफाईची सुरवात केली नाही ते तत्काळ साफ करण्यात यावे. नाल्यातून काढलेला गाल दुसऱ्या दिवशी उचलण्यात यावा. एक आठवडाच्या आत नाले सफाई झाली नाही तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आदोलन घेण्यात येईल असा इशारा शहर प्रमुख सचिन पाटील यांनी यावेळी दिला. यावेळी विधानसभा संघ टीका योगिता नाईक, महीला शहर समन्वय प्रियांका सावंत, विभाग प्रमुख शनिदास पाटील, नागेश पवार, उपविभाग प्रमुख संजय अर्दाळकर, शाखा प्रमुख प्रतिक म्हात्रे, सचिन पारकर, ओकेश भगत, मूर्ती मुंडे, उप शहर अधिकारी सुयोग राणे, विकास उमेकर, अमोल म्हात्रे, तेजेस फोपाळे उपस्थित होते.

error: Content is protected !!