ठाणे :- ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या ही शंभरी नंबरी झाली आहे. शनिवारी ०९ रुग्ण आढळून आल्याने रुग्ण संख्या १०३ झाली असून त्यापैकी ३५ रुग्णांचे पाच दिवसांचे गृह विलगीकरण पूर्ण झाले आहे. तर ५१ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तर १६ रुग्ण हे रुग्णालयात उपचारार्थ दाखल असून त्यांचीही प्रकृती स्थिर आहे. यामध्ये १३ रुग्ण खासगी तर ०३ रुग्ण कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आहेत. अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.