ठाणे:- घरात चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट झाल्याची घटना रविवारी सायंकाळी मुंब्र्यातील अल्मास कॉलनी येथे घडली. या घटनेत नुसरत सय्यद (४५) या आईसह तिच्या मुली हफजा (२४) आणि अफजा (१८) अशा मायलेकी जखमी झाल्या आहेत. त्या ३० टक्के पेक्षा जास्त भाजल्याने त्यांच्यावर मुंब्र्यातील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर मुंबईतील वाडिया रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर त्यांच्या चेहऱ्याला व हाताला भाजल्याने दुखापत झाली आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
मुंब्र्यातील अल्मास कॉलनी येथील सुप्रीम टॉवर या इमारतीच्या तळ मजल्यावरती असलेल्या रूम क्रमांक ०५ मध्ये ठेवण्यात आलेल्या दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट होऊन आग लागली आहे. अशी माहिती मोहम्मद अकबर यांनी मुंब्रा अग्निशमन दलाला दिल्यावर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तदपूर्वीच स्थानिकांनी त्या आगीवर नियंत्रण मिळून त्या मायलेकींना उपचारार्थ बिलाल या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्या घटनेत त्या महिला ३० टक्के पेक्षा जास्त भाजलेल्या असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या वाडिया हॉस्पिटल दाखल केले आहे. यामध्ये तिघींचच्या ही चेहऱ्याला व हाताला भाजल्याने दुखापत झाली आहे.
याशिवाय या घटनेत घरातील वॉशिंग मशीन, कपडे, इलेक्ट्रिक वायरिंग जळून नुकसान झाले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.






