Homeठाणे-मेट्रोठाणे महापौरपद 'SC' प्रवर्गासाठी आरक्षित; यंदा दिवा शहरही महापौर पदाच्या शर्यतीत

ठाणे महापौरपद ‘SC’ प्रवर्गासाठी आरक्षित; यंदा दिवा शहरही महापौर पदाच्या शर्यतीत

प्रभाग 28 मधील दीपक जाधव यांचे नाव ही चर्चेत

ठाणे:ठाणे महानगरपालिकेच्या आगामी महापौरपदासाठीची आरक्षण सोडत गुरुवारी पार पडली. या सोडतीमध्ये महापौरपद अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याचे जाहीर झाले आहे. या आरक्षणानंतर आता ठाण्याच्या महापौरपदी कोण विराजमान होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, यंदा दिवा शहर ही पहिल्यांदा महापौर पदाच्या शर्यतीत आले आहे. दिवा शहरातून प्रभाग 28 मधून निवडून आलेले दीपक जाधव यांच्या नावाची चर्चा आहे.
दिवा शहराला पहिल्यांदाच बहुमान मिळणार?
शिवसेना (शिंदे गट) कडून अनुसूचित जाती प्रवर्गातून एकूण ७ उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये ठाणे शहरातील सहा उमेदवारांचा समावेश आहे, तर दिवा शहरातून दीपक जाधव हे एकमेव उमेदवार निवडून आलेले आहेत. दीपक जाधव यांनी प्रभाग क्रमांक २८ अ मधून विजय संपादन केला आहे.
आतापर्यंत ठाणे महापालिकेत दिव्यातील लोकप्रतिनिधीला महापौरपदाचा मान मिळालेला नाही. त्यामुळे, यावेळी दीपक जाधव यांच्या रूपाने दिवा शहराला पहिल्यांदाच महापौरपद मिळावे, अशी आग्रही मागणी दिवावासीयांकडून केली जात आहे.

दीपक जाधव हे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांचे समर्थक मानले जातात. शिवसेना शिंदे गटातील सात उमेदवारांच्या शर्यतीत जाधव यांचे नाव सध्या चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. दिवा शहराचा वाढता विस्तार आणि तेथील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी दिवा शहराला महापौरपद मिळणे आवश्यक असल्याची भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!