सुहास खंडागळे
अल्पावधीत दिवा शहराच्या प्रश्नावर रमाकांत मढवी यांनी शासनाच्या माध्यमातून विविध पातळीवर विकास निधी आणून शहराचा कायापालट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. दहा पंधरा वर्षांपूर्वीचे दिवा शहर आज आपल्याला बदललेले पाहायला मिळते. यामागे शासनाच्या माध्यमातून योग्य पद्धतीने शहराच्या विकासासाठी विकास निधी आणण्यासाठीची धडपड करणारे नेतृत्व रमाकांत मढवी यांच्या माध्यमातून दिवा शहराला मिळाले ही वस्तुस्थिती आहे. मढवी यांचे दिवा शहराच्या विकासाबाबतचे प्रयत्न आणि त्यांचे योगदान नाकारता येणार नाही. दिवा शहराच्या राजकारणावर मढवी यांचा प्रभाव आहे.
ज्या पद्धतीने दिवा शहर मागील काही वर्षात वाढले त्या अनियोजित शहराला नियोजित शहराच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे फार अडचणीचे असतानाही आज दिवा शहरात नियोजन पद्धतीने विकासास सुरुवात झालेली पाहायला मिळते. किमान पायाभूत सुविधांचा दर्जा हा मागील काही वर्षात सुधारलेला दिसतो. यामध्ये रस्ते विकास, गटारे, पायाभूत सुविधा आणि पाणी समस्येवर उपायोजना या दृष्टिकोनातून बदल झालेला लक्षात येतो. आरोग्य केंद्र सुरू झालेली पाहायला मिळतात. हा बदल परिपूर्ण नसला तरी येणाऱ्या काळात दिवा शहर अधिक चांगल्या पद्धतीने विकसित होईल याची ही सुरुवातच म्हणावी लागेल.
आज दिवा शहर आणि परिसरात विविध विकास प्रकल्प सुरू आहेत. या मागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांचे मार्गदर्शन आणि रमाकांत मढवी यांची दिवा शहराला अधिकाधिक विकास निधी मिळवण्याची धडपड दिसून येते. तात्कालिक उपायोजना करण्याऐवजी भविष्यातील शहराला उपयोगी होईल अशा पद्धतीचे धोरण मढवी यांच्याकडून दिवा शहरासाठी राबवले जात असून त्या दृष्टीने त्यांची शहर विकासाची भूमिका असल्याचे पाहायला मिळते.
ज्या पद्धतीचे काम मागील दहा वर्षात दिवा शहरात झाले आहे. ते पाहता आगामी काळात दिवा शहरात आरोग्य, शिक्षण आणि अन्य मूलभूत सुविधा याबाबत सकारात्मक विकास येथील जनतेला पाहायला मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
शहराच्या सर्वांगीण विकासाची जिद्द रमाकांत मढवी यांच्याकडे असल्याने आणि त्यांच्या पक्ष नेतृत्वाचा आशीर्वाद त्यांच्यासोबत असल्याने दिवा बदलण्याचे शिवधनुष्य रमाकांत मढवी पार पाडतील अशी येथील जनतेची अपेक्षा आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा!






