Homeशहर परिसरदिव्यातील फेरीवाल्यांवरील कारवाईला मनसेचा जाहीर पाठिंबा

दिव्यातील फेरीवाल्यांवरील कारवाईला मनसेचा जाहीर पाठिंबा

सहाय्यक आयुक्त प्रवीणकुमार फड यांच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी

दिवा : दिवा शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केल्याच्या रागातून फेरीवाल्यांनी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त प्रवीणकुमार फड यांच्यावर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) प्रशासनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. मनसेच्या दिवा शहरातील पदाधिकाऱ्यांनी वॉर्ड ऑफिसर यांची भेट घेऊन सहाय्यक आयुक्तांनी केलेल्या कारवाईला समर्थन देणारे पत्र सादर केले.

दिवा शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेली कारवाई कोणत्याही दबावाला बळी न पडता यापुढेही सुरू ठेवावी, अशी ठाम भूमिका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडली. अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईदरम्यान प्रशासनाला मनसेच्या सहकार्याची आवश्यकता भासल्यास पक्ष प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे आश्वासनही देण्यात आले.

दिवा शहरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त राहणे आवश्यक असून, नागरिकांचे हे हक्क अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने निर्भयपणे कारवाई करावी, अशी भूमिका मनसेने घेतली आहे.

अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई करताना प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी पडू नये. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि नागरिकांना रस्ते व पदपथांचा विनाअडथळा वापर करता यावा, यासाठी अतिक्रमणांविरोधातील कारवाई सातत्याने सुरू ठेवावी, असे आवाहनही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिवा शहर शाखेच्या वतीने करण्यात आले.

error: Content is protected !!