उप मुख्य स्वच्छता निरीक्षक यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन केली पाहणी
दिवा पश्चिम रेल्वे फाटक्याजवळील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला होता अनेक नागरिकांनी व ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर आज ठाणे महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक यांना प्रत्यक्ष जागेवर बोलावून *नगरसेवक आदेश भगत* यांनी या कचरा कोंडीवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली तसेच यानंतर येथे अशा प्रकारचा कचरा साचता कामा नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देखील अधिकाऱ्यांना दिल्या.
अतिरिक्त घंटागाडी सुरू करणार
दिवा पश्चिमेला रेल्वे फाटकामुळे घंटागाड्यांची ये-जा वेळेत होत नसल्यामुळे कचरा वेळेवर उचलला जात नसल्याचे लक्षात येते, त्यामुळे अतिरिक्त नवीन घंटागाडी ही स्टेशन परिसरात सुरू करावी अशी मागणी नगरसेवक आदेश भगत यांनी यावेळी केली.
सुट्टीच्या दिवशीही कचरा उचलला जाणार
सुट्टीच्या दिवशी विशेषतः रविवारी कामगार उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचला जातो. परिणामी येथून ये जा करणाऱ्या नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. याशिवाय बालदा नगर परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व रोगराई देखील पसरते. यासाठी नगरसेवक आदेश भगत यांनी ठाणे महानगरपालिकेचे उपमुख्य स्वच्छता निरीक्षक परदेशी यांना सुट्टीच्या दिवशीही या ठिकाणी कचरा उचलण्यासाठी कामगार उपलब्ध करावे अशा सूचना केली.
कचरा टाकणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई
घरात व दुकानात साचलेला कचरा सकाळी घंटागाडीत न टाकता रेल्वे फटका जवळ उघड्यावर टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी देखील नगरसेवक आदेश भगत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडे केली.
अतिरिक्त घंटागाडी या ठिकाणी उभी करावी
दिवा पश्चिम रेल्वे फाटकाजवळ साचलेला कचरा उचलल्यानंतर नागरिकांकडून या ठिकाणी दुपारी पुन्हा मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असल्याचे लक्षात आले आहे. यासाठी सकाळी कचरा उचलल्यानंतर एक अतिरिक्त घंटागाडी या ठिकाणी उभी करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक आदेश भगत यांनी अधिकाऱ्यांकडे केली. त्याला देखील सकारात्मक प्रतिसाद यावेळी देण्यात आला.






