Homeशहर परिसरनगरसेविका अर्चना पाटील व विभाग प्रमुख निलेश पाटील यांचा दिवेकरांसाठी महत्वाचा निर्णय,...

नगरसेविका अर्चना पाटील व विभाग प्रमुख निलेश पाटील यांचा दिवेकरांसाठी महत्वाचा निर्णय, प्रचंड पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी थेट मुख्य अरुंद नाला फोडून नाल्याचे रुंदीकरण केले

या निर्णयामुळे दिवा शहरातील बहुतांश पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार

दिवा: मुसळधार पावसामुळे दिवा शहरात पाणी साचण्याचे प्रमाण वाढत असताना पाण्याचा निचरा नीट होण्यासाठी विभाग प्रमुख निलेश पाटील व नगरसेविका अर्चना पाटील यांनी धडाकेबाज भूमिका घेत थेट दिवा डंपिंग येथील खाडी किनारी असणारा अरुंद नाला फोडून दिवा शहरात साचलेले पाणी जलद गतीने वाहून जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. दिवा शहरात मुसळधार पावसाचे पाणी साचून राहू नये यासाठी नगरसेविका अर्चना पाटील व निलेश पाटील यांनी घेतलेला हा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे.

सध्या ज्या पद्धतीने मुसळधार पाऊस पडत आहे ते पाहता शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून निलेश पाटील व अर्चना पाटील यांनी घेतलेला हा निर्णय महत्वाचा आहे. जिथे जिथे पाण्याला अडकला होत आहे, तेथील नाल्यांचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. नेमकी हीच बाब निलेश पाटील यांनी तातडीने केली आहे.

आधी याठिकाणी पाच मोठे पाईप टाकून पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र त्यातील एकच पाईप मधून पाणी जात होते. यामुळे पाणी तुंबून शहरातील पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत होता.ही बाब विभाग प्रमुख निलेश पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर नगरसेविका अर्चना पाटील व पालिकेचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पोकलेनच्या मदतीने थेट मुख्य अरुंद नाला तोडण्याचा निर्णय घेतला.

याबाबत निलेश पाटील यांनी दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी यांच्या कानावर ही बाब टाकली. मढवी यांनी दिवा शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी जे करणे गरजेचे ते करा अशा सूचना पाटील यांना दिल्या.

निलेश पाटील व नगरसेविका अर्चना पाटील यांनी दिवा वासियांच्या हितासाठी थेट मुख्य नालाच तोडून रुंद केल्याने याचा फायदा दिवा स्टेशन परिसर,चंद्रांगण टॉवर परिसर,कोकण रत्न परिसर साबे,साळवी नगर साबे,ओमकार नगर,बी आर नगर, सिद्धिविनायक नगर या भागातील पाणी थेट खाडीला वाहून जाण्यास मदत होणार आहे. पाणी वाहून जाण्यास अडथळा असणारा अरुंद नालाच फोडल्याने दिवेकरांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा निलेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!