दिवा : दिव्यातील लोकप्रिय नगरसेवक तथा शिवसेना उपशहर प्रमुख शैलेश मनोहर पाटील यांचा वाढदिवस विविध लोकोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त दिवा शहरातील विविध मान्यवर, कार्यकर्ते, महिला व नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून शैलेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली.
तसेच मुंब्रादेवी कॉलनी येथे कैलेश मनोहर पाटील यांच्या वतीने अन्नदानाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. नागरिकांना अन्नदान करून वाढदिवस सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून साजरा करण्यात आला.
दिवा शहरातील विविध भागांत कार्यकर्ते, महिला व नागरिकांच्या सहभागातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छांचा कार्यक्रम न ठेवता विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि अन्नदानासारखे सामाजिक उपक्रम राबविल्याने या उपक्रमांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.






