ठाणे : दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 27 व 28 मध्ये 800 मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर आगासन फाटकाजवळ गळती झाल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. मुख्य जलवाहिनीला झालेली गळती थांबविणे अत्यावश्यक आहे. जेणेकरुन आगासन, बेतेवडे, गणेश नगर, बेडेकर नगर, म्हसोबा नगर, शांती नगर, बी.आर. नगर, मुंब्रा देवी कॉलनी, साबे गाव तसेच दिवा पश्चिम परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या पाण्यासंबंधी तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे.
या कामासाठी दिनांक 4 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत 12 तासांकरिता पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.परिणामी दिवा शहरातील प्रभाग क्र. 27 व 28 या परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सदर परिसरातील पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






