Homeशहर परिसरदिवा शहरातील लहान मोठ्या दुकानदारांना आपल्या दुकानात कचरापेटी (Dustbin) ठेवण्याचे निर्देश द्या...

दिवा शहरातील लहान मोठ्या दुकानदारांना आपल्या दुकानात कचरापेटी (Dustbin) ठेवण्याचे निर्देश द्या ..

नगरसेवक अँड आदेश भगत यांची सहायक आयुक्तांकडे मागणी

मागील काही वर्षांत दिवा शहराचे झपाट्याने शहरीकरण झाले असून स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आपला दिवा शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी शहरातील प्रत्येक घटकांनी आपलं योगदान दिलं पाहिजे ह्यासाठी शिवसेना नगरसेवक अँड.आदेश भगत यांनी सहायक आयुक्त यांना लेखी निवेदन देऊन स्वच्छता राखण्यासाठी व्यापाऱ्यांना निर्देश देण्याची मागणी केली

दिवावासियांना व पंचक्रोशीतील इतर गावांना दिवा शहर हे मुख्य बाजारपेठ ठरली आहे. खरेदीदार वाढल्याने इथे लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने, हॉटेल, स्नॅक्स कॉर्नर, गोडाऊनस थाटली आहेत. दिवा शहरात स्वच्छतेचा प्रश्न फार गंभीर असून दिवा शहरातील बहुतेक लाहन-मोठया दुकानात कचरापेटी (डस्टबीन) ची व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी ग्राहकांतर्फे फेकायचा कचरा व व्यापाऱ्यांकडून दुकानातील कचरा हा रस्त्यावर फेकला जातो. त्यामुळे अस्वच्छतेमध्ये आणखी भर पडते.

दिवा शहरात स्वच्छतेचा विषय गंभीर असला तरी प्रशासनाबरोबरच शहरातील सर्वच घटकांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला पाहिजे. लहान मोठे दुकानदार, व्यापारी, हॉटेल यांनी आपल्या दुकानात छोटीशी कचरापेटी ठेवली पाहिजे. दुकानात कचरापेटी नसल्याने ग्राहक कचरा बाहेर रस्त्यावर फेकतात या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि महत्वाचे म्हणजे ज्या दुकानाबाहेर, हॉटेल बाहेर कचराकुंडी आहे अशा वेळी नागरिकांनी देखील कचरा उपल्ब्ध कचरापेटीत टाकून रस्त्यावर फेकणे बंद केले पाहिजे. रस्ते वगळून आपल्या इमारतींच्या आवारात व दोन इमारतींच्या मागे कचरा टाकण्याची जणू स्पर्धा निर्माण झाली आहे. नागरिकांची साथ लाभली तर आपण नक्कीच स्वच्छ दिवा सुंदर दिवा निर्माण करू शकतो असे मत नगरसेवक अँड आदेश भगत यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!