Homeशहर परिसरभाजपचे रोहिदास मुंडे यांची महाराष्ट्र दहीहंडी असोसिएशनच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती

भाजपचे रोहिदास मुंडे यांची महाराष्ट्र दहीहंडी असोसिएशनच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती

दिवा:- महाराष्ट्र दहीहंडी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी दिवा भाजपचे मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांची निवड करण्यात आली आहे.

गोविंदा पथकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सर्व गोविंदा मंडळांनी एकत्र येत महाराष्ट्र दहीहंडी असोसिएशन या संस्थेची स्थापना केली असून या संस्थेवर रोहिदास मुंडे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्याचबरोबर ठाणे शहरातील जुने गोविंदा पथक मधील समीर पेंढारी, राकेश यादव यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली असून निलेश वैती यांचीही खजिनदार पदी नियुक्त करण्यात आली आहे. सचिन खारकर यांची गोविंदा पथक सदस्य पदी नियुक्ती झाली आहे.

error: Content is protected !!