दिवा: महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती असलेला वडापाव आता केवळ गल्लीपुरता मर्यादित न राहता एका कॉर्पोरेट ब्रँडच्या रूपात समोर येत आहे. ‘इंडियाज पहिला स्ट्रीट फूड ब्रँड’ अशी ओळख निर्माण करणाऱ्या ‘रोको वडापाव’ चे दालन आता दिवावासीयांच्या सेवेसाठी सज्ज झाले असून, याचा भव्य उद्घाटन सोहळा उद्या पार पडणार आहे.
दिव्यातील नगरसेवक शैलेश पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनातून आणि माध्यमातून हा नवा व्यवसाय सुरू होत आहे.
वडापावला केवळ एक खाद्यपदार्थ न ठेवता त्याला एक मोठा ब्रँड म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. ‘ईट हॉट, हिट हार्ड’ असे ब्रीदवाक्य असलेल्या या ब्रँडमुळे स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासोबतच खवय्यांना स्वच्छ आणि चविष्ट वडापाव मिळण्यास मदत होणार आहे.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ ची विजेती तन्वी कोलते हिची उपस्थिती. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शुक्रवार , १ मे २०२६ रोजी संध्याकाळी ७:०० वाजता दिवा शीळ रोडवरील ‘चंद्रागण रेसिडेन्सी’ येथे हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या निमित्ताने दिव्यात वडापावच्या एका नव्या पर्वाची सुरुवात होत असून, परिसरातील नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






