Homeठाणे-मेट्रोठाणे महापालिका शाळांतील समस्यांबाबत नगरसेविका अर्चना पाटील यांची उपआयुक्तांसोबत बैठक

ठाणे महापालिका शाळांतील समस्यांबाबत नगरसेविका अर्चना पाटील यांची उपआयुक्तांसोबत बैठक

ठाणे: ठाणे महानगरपालिका प्रभाग क्र. २९ मधील बालवाडी क्र. ४९, शाळा क्र. ८० व ८४ येथील शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि शाळांमधील अपूर्ण कामांबाबत नगरसेविका सौ. अर्चना निलेश पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी नुकतीच उपआयुक्त डॉ. मिताली संचेती यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि त्यांना मागण्यांचे लेखी निवेदन सादर केले.

या बैठकीत सौ. अर्चना पाटील यांनी शाळांमधील मूलभूत सुविधांचा अभाव आणि शिक्षकांना भेडसावणाऱ्या अडचणींची सखोल मांडणी केली. विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक वातावरण मिळावे आणि शिक्षकांच्या समस्या सुटाव्यात, यासाठी प्रशासन स्तरावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत उपआयुक्त डॉ. मिताली संचेती यांनी संबंधित विभागांना शाळांची अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी प्रभाग २७, २८ आणि २९ मधील सहकारी नगरसेवकांनीही उपस्थित राहून आपल्या प्रभागातील शाळांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. या बैठकीला प्रामुख्याने नगरसेवक ॲड. आदेश भगत, नगरसेविका दिपाली भगत, नगरसेवक दीपक जाधव, नगरसेविका साक्षी रमाकांत मढवी, पठाण सर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आदित्य डावखर, तसेच शाळांतील मुख्याध्यापिका आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते. आपल्या प्रभागातील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचा निर्धार सौ. अर्चना पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

error: Content is protected !!