Homeठाणे-मेट्रोडाॅ.जितेंद्र आव्हाड, मनोज प्रधान यांच्यासह राष्ट्रवादी (श.प.) चे नगरसेवक जंतरमंतरवर

डाॅ.जितेंद्र आव्हाड, मनोज प्रधान यांच्यासह राष्ट्रवादी (श.प.) चे नगरसेवक जंतरमंतरवर

ठाणे – नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि सर्व नगरसेवक सहभागी झाले. या प्रसंगी अभिजीत दिपके यांची भेट घेऊन डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच, महाराष्ट्रातील लढा आपण ताकदीने लढू, असे आश्वासित केले.

नीट पेपर घोटाळाप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी सोनम वांगचूक आणि काॅक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत जोरदार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 20 जुलै रोजी या आंदोलकांवर जोरदार लाठीहल्ला करण्यात आला. गुरूवारी या आंदोलनात डाॅ.जितेंद्र आव्हाड, मनोज प्रधान, ठामपा विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण, गटनेते अभिजीत पवार, महिलाध्यक्ष मनिषा भगत यांच्यासह इतर नगरसेवकांनी सहभाग घेतला. जंतर मंतर मैदानावर डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.
यावेळी, विद्यार्थ्यांना हलक्यात घेऊ नका. या देशात विद्यार्थ्यांनीच क्रांती घडविली आहे. या देशात सर्वात ताकदवान असलेल्या इंदिरा गांधींना बिहार आणि गुजरातमधील विद्यार्थ्यांनीच हादरा दिला होता. विद्यार्थ्यांनीच 1973 साली जयप्रकाश नारायण यांच्याकडे आंदोलनाचे नेतृत्व सोपविले होते. या आंदोलनानंतर आणीबाणी आणि नंतर इंदिरा गांधी यांना पायउतार व्हावे लागले होते. स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीश सत्तेला सर्वात मोठा धक्का देणारे शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हेही विद्यार्थीच होते. आज देशात जे घडत आहे, त्याची हेटाळणी करणे ही इतिहासाची मोठी चूक ठरेल, असे डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.

error: Content is protected !!